उदार तू हरी ! म्हणती तुझे भक्त

उदार तू हरी ! म्हणती तुझे भक्त । इतर अभक्त वाया गेले ! ॥
कासया गा ! जग करिसी निर्माण ? । मिळेना मिष्टान्न खावयाला ॥
की ते करावी न मिळे खायासी । जगी उपवासी मरू लागे ॥
तुकड्यादास म्हणे करू कैसी भक्ती ? । जेणे मिळे मुक्ती संतापायी ॥