अावडे तुज भक्त देवा !

आवडे तुज भक्त देवा ! । तरी का न उद्धरावा ? ॥
तुझे नामी जे नाचती । करिसी त्यांची तू फजिती ॥
हरिश्चंद्र सत्यवान । राज्य नेले ते हरून ।।
तुकड्या म्हणे रामराया ! । येई भक्तांसी ताराया ॥