मंगल तोचि खरा, मोरया

(चाल : तू माझा यजमान रामा..)
मंगल तोचि खरा, मोरया ।।धृ ।।
गणनायक बिजरुपनिवासी, मूल अधारी झरा ।।१।।
ओंकारी मुळ सोंड विराजत, नाभि जयाच्या हिरा।।२॥
पंचभुतात्मक वस्त्र जयासी, त्रिकुट मुकुट सुंदरा। ।।३॥।
अर्धांगी निवृत्ति सरस्वती, प्रगट दिसे भूवरा। ।।४॥।
गणपति जो सचराचरवासी, जाणिल तोचि पुरा। ।।1५।।
तुकड्यादास शरण त्या पाया, भक्ति तयाची वरा ।।६॥।