उणा पाहशील दुसर्याला, उणीवेने उणा होशी
(चाल: अगर है ग्यान को पाना...)
उणा पाहशील दुसर्याला, उणीवेने उणा होशी ।
समजशी पूर्णता सगळी, अमर सुख अनुभवा घेशी ।।धृ०।।
न जग हे तिळ उणीवेचे, असे भरले सुखत्वाचे ।
प्रभू नटुनीच जग साचे, पाहतो मौज ही खाशी ।।१॥
कुठे तो वृक्ष होऊनी, पाहतो शांतता अपुली ।
कुठे नदिच्या प्रवाही हा, राहुनी तृप्ति दे त्यासी ।।२॥
कुठे होऊनिया राजा, प्रजेला सुख दे सगळ्या ।
कुठे होऊनि अतिदीन, मागतो भीक जनतेसी ॥३॥
सर्व हा देवची नटला, जाणुनी अनुभवा घेणे ।
तो तुकड्यादास सांगतसे, भागवति रीत ही ऐसी ।।४॥