भज गणराज दयाल, प्राण्या!
चाल: तू माझा यजमान रामा..)
भज गणराज दयाल, प्राण्या! ।।धृ०।।
सेंदुर-भूषण, उंदीर वाहन, हिमनगजेचा बाल । प्राण्या।।१।।
सरस्वती -वर, शंकर-तनया, गळी मुक्तांची माळ । प्राण्या ।।२॥।
मंगलमूर्ती विघ्नविनाशक स्मरता तुटतील जाल । प्राण्या।।३।|
तुकड्यादास तयाला ध्यायी, तोचि करी प्रतिपाल । प्राण्या।।४ ।।