कठिण मन का हरी ! केले

(चालः अगर है ग्यान को पाना...)
कठिण मन का हरी ! केले, नसे का तुज दया थोडी ? ।
तुझ्याविण अखिल या जगती, कोण आम्हासि रे ! जोडी ? l।धृ०।।
अशाश्वत दृश्य हे सगळे, कधी दिसते, कधी नसते ।
राहते नी किती जाते, साथ हा   घाट   मम   सोडी ॥१॥
स्वार्थि या लोकिचे गाणे, प्रेमही स्वार्थिचे जाणे।
कळेना कोण हे जीणे ? कुठे वाढे, कुठे   मोडी ? ।।२।।
अनुभवे पाहता जगती, न काही सत्यसे दिसते।
प्रभू ! तूची खरा असशी, म्हणुनि ही गर्जना फोडी ।।३॥
पदरि घे दास-तुकड्याला, उरु न दे देह-भावाला।
रंग तव लाव जीवाला,  देह   तुजवरुनि   कुरवंडी ॥४॥