उभा का मंदिरी रामा ! पहा बाहेर येवोनी
(चाल: मनाला स्थिर करावया...)
उभा का मंदिरी रामा ! पहा बाहेर येवोनी ।
गर्जती भक्त तव दारी, जरा तरि ऐक बा ! कणी l।धृ०।।
दुष्ट संहारण्याकरिता, तुझा अवतार तो होता ।
अता का जानकीनाथा ! दिसेना भूवरी कोणी ? ॥१॥
कितीतरि त्रास भक्तांना, कुणाला हाल बघवेना।
तमिळेना अन्न पोटाला, किती मरती दुखे प्राणी ।।२।।
ऊठ घे चाप धर हाती, असुर मरदावयासाठी ।
ख बा ! लाज भक्तांची, न तुजविण दान दे कोणी ॥३॥
गंग हनुमंत ताताला, कि वर दे आपुल्या भक्ता ।
पाहशी अंत किती आता ? धरी तुकड्या सदा चरणी ॥४।।