कोण करी भवपास अनाथा? कोण करी?
कोण करी भवपास अनाथा? कोण करी? ।।धृ०।।
तारक तूचि मनी समजोनी, दीनपणे जोडित मी पाणी।
ठेवित तब चरणावरि माथा । कोण० ।।१॥।
भवसागर हा दुस्तर भारी । जाइन कैसा तुजविण पारी?।
माया-बंधन दूर॒ सुटेना, कर्मठ हा धन-बंध तुटेना ।
कि वा । कोण० ।।३॥।
तारक तू सकलांचा रामा ! कर करुणा, करुणा- घनश्यामा ।
तुकड्यादासा घे निज हाता । कोण ०॥।४॥।
देइ मना सद्गुरु! ह ।।
नच सांभाळे काळ-उसांडा, नलगे मज सुख-संपद-रांडा ।
मानिन मी तुज ईश््वर-भावा ।।१॥।।
वृत्ति सदा नि:संग असू दे, मूळ-रुपांतरि स्वस्थ बसू दे।
तुकड्यादास म्हणे गुरुदेवा! ।॥।४|॥। ॒