नटला भक्तांचे साठी, हाती नरोटी घेऊनि

नटला भक्तांचे साठी, हाती नरोटी घेऊनि ।।धृ०।।
सोडुनी देवपण सारे, करि दासासम काम रे!
प्रेमाचे : - सगळे वारे, अंगी भरवी नेउनी ।।१॥।
चोख्याची ढोरे ओढी, माना, अपमाना सांडी ।
जनिसवे दळी वा कांडी, प्रेमा दावी सेवुनी ।।२।|
धावला भक्तजन-काजा,नच लाज कशी महाराजा !
खांदी घोंगडिया साजा, रसिदा घेसी लिहुनी ।।३।।
द्रोपदीस सांभाळाया, वाढवी चीर॒यदुराया !
तुकड्यास ठाव दे पाया, अक्षय शांती देउनी ।।४॥।।