कधि भेटशि यदुराया !
(चाल: भूषविशी जननीला..)
कधि भेटशि यदुराया ! कधि भेटशि यदुराया ! सखया ॥धृ॥
संसाराचा पाश कठिण हा मोहविते मन काया ॥१॥
क्षणिक तनूचा नाहि भरवसा जाइल वैभव वाया ॥२॥
आवड ही मम अंतरि वाहे ठेव देह तव पाया ॥३॥
तुकड्यादास म्हणे करुणा कर लावि मती गुण गाया ॥४॥