काम क्रोध मद मत्सर l यांनी पिडलो मी फार

काम - क्रोध - मद - मत्सर । यांनी पीडलो मी फार ॥
मन न राही एकांत । किती    पाहसी   मम  अंत ? ॥
नाही बाप-माय मला । शरण जाऊ मी कवणाला ? ॥
तुझा दास झालो देवा ! । घडो चरणांची सेवा ॥
आणिक न मागे मी काही । तुकड्या ठाव येई पायी ॥