मन हे तुझ्या विरहाने, झुरत रे लाजिरवाणे

(चाल: रमला कुठे ग कान्हा ग)
मन हे तुझ्या विरहाने, झुरत रे लाजिरवाणे ।।धू०।।
तू लाविशि वेळ कशाला? का भेट न देशि अम्हाला ?
अति दु:ख सख्या! जिवप्राणे, झुरते रे ! लाजिरवाणे ।।१॥।
रानी हंबरती गायी, पाहती तुज वळूनि सदाही।
रडती गोपाल दुःखाने, झुरते रे! लाजिरवाणे ।।२॥|
राधेस गमेना काही, जणु चंद्र-चकोर-तुटी ही ।
बघ एक वेळ प्रेमाने, झुरते रे! लाजिखाणे ।।३॥।
तू. निघुनी येथुनि गेला, हा ओसचि भारत झाला ।
धरला करि हा असुराने, झुरते रे! लाजिरवाणे ।1४।॥।
चल ये अमुच्या कनवाळा, पुरवी भक्तांचा आळा ।
सांगति तव ब्रीद पुराणे, झुरते रे! लाजिरवाणे ।1७ ।।
तुकड्याची आशा ऐसी, तू. अवनीवर अवतरसी | 
पळतील असुर हिरसाने, झुरते रे! लाजिरवाणे ।॥।६।।