धन्य धन्य गे स्फूर्ति-तन्मये! अखिल विश्‍व-व्यापिनी ।

चाल : भला जन्म हा तुला लाभला...)
धन्य धन्य गे स्फूर्ति-तन्मये! अखिल विश्‍व-व्यापिनी ।
नमन मम मनोत्साहि स्वामिनी! ।।धृ०।।
प्रथम बीज ओंकार तुझा या जगदुत्पत्ती-मुळी ।
प्रसवली निज चेतन्या-कुळी ।।
स्फूर्ति शुध्द-स्फुरणात प्रगटुनी, वाढवि वंशावळी ।
प्रगटली नभा-आत बिजकळी ।।
(अंतरा) मज न कळे तू की तुझा कुणी दूसरा।
पाजिसी अखिल विश्‍्वासी जीवन-झरा।
नच अंत तुझा गे ! परेवरीच्या परा।
गंगेवर जणु तरंग, तेसी ब्रह्मी तू रंगिणी । नमन० 11१ ॥।
नाभि-कमल-किरणात तेज झकझकाक दिसती खरे ।
तेच तव स्वरुपाचे गे ! झरे ।।
निजानंदि अवतरणी भरली, अंगभास दाविते।
शवासरुप घेउनि बर वाढते ।।
इडा-पिंगळा वसन नेसुनी, भ्रमरी झुंजारिते।
नख-शिखी बहुत रंग दाविते ।।
(अंतरा) गे ! किती बर्णू गुण तुझे स्वरुप, माउले।
नच तुझा खरा मज अंत, सखे ! गे कळे।
तव-दूर॒ राहिले सत्य, ब्रह्म आगळे ।
अगम्य अगणित वेदश्रुतीची तूचि खरी निर्मिणी। नमन ०|।२॥।
करी प्रखर भव-पार, दीनाची करुणा घेई मनी ।
त्रासलो जग-पाशे स्वामिनी! ।।
तेज देइ स्फूर्तिला, प्रगटवी ज्ञानाग्नीचा ध्वनी ।
दाखवी तेज सतेजाहनी।।
_ सत्य कृत्य मनि घडो, पडो हे मस्तक पदि पावनी ।
होई मग तुकड्या तल्लीन मनी ।।
(अंतरा) तव आरंभी आवडी लागली मला ।
दे स्फूर्तिमायगे ! तव गुणगानी कला ।
टाळी गे मनाची दुरव्यवसणाची बला ।
होऊ दे सुखी तव पदी बाळ आपुला ।
श्री ! सुस्वर गाताची पावसी,इच्छा धरिली मनी । नमन० ।।3।।