आजी उघडिले भांडार I

आजी उघडिले भांडार । देवा! तुझ्या पायावर ॥
ऐसे केवि म्हणो आम्ही । तू तो आहे अंतर्यामी ॥
तुला न सांगता कळे । माझ्या जीवीचे डोहाळे ।।
तुकड्या म्हणे लावा पायी । ठेवा पायरीचे ठायी ॥