का रुसला देवदेवा ! भेटी द्यावी या दिना ।

का रुसला देवदेवा ! भेटी द्यावी या दिना । ।।धृ०।।
दिनाचा दयाळू अससी, आस ही मना ।।1।।
मोहिले कुणी का तुजला ? म्हणुनी येईना ।।2।।
काय कुठे गेला अससी, स्वर्गि पाहणा? ।।३॥
मनाचा कृपाळू अससी, नाडला कुणा।॥।॥४॥।
_ शांतविण्या तुकड्यादासा, ये दयाघना ।।५॥|