भक्तीला पूर्ण विसावा, ऐशा देवा दाखवा
(चाल: ना छेडो गालि देऊँगी..)
भक्तीला पूर्ण विसावा, ऐशा देवा दाखवा ।।॥धृ० ।।
नयनास लागली ज्वाला, हृदयास टोचला भाला ।
कुणी हरवा या दुःखाला, ब्रिद हे माझे राखवा ।।१ ।।
कुठवरी धीर मी साहु? केसा जीवनाविण राहु ?
तो जिवलग कोठे पाहू? नयनी माझ्या आखवा ।।२।।
अजवरी दाविली शोभा, झकदार झकाकी आभा ।
गंभीर रुपाचा गाभा, पुनरपि प्रेमा चाखवा ।।३॥।
कर्णास मोहनी घाली, ती वेणू कोठे गेली?
. तुकड्याला भूली पडली, नयनी नयना माखवा ।।४ |