मज नाहि कुणाची आशा, त्या जगदीशा वाचुनी

(चाल: ना छेडो गाली देऊँगी...)
मज नाहि कुणाची आशा, त्या जगदीशा वाचुनी ।।धृ० ।।
भव-सागर-लहरा भारी, मज कोण येउनी तारी । ॒
तो तूची खरा कैवारी, संकट वारी धावुनी ।।1।।
ध्रुवबाळ पाच वर्षाचे, नामसमरणी त्या नाचे ।
दिधले स्थळ ते मोक्षाचे, अढळ पदासी नेऊनि ।।2।।
प्रल्हाद बाळ वाचविला, खांबामधुनी खळवळला ।
काश्यपू दृष्ट मारियला, तुकड्या सांगे