का रे वेळ हरी ! आता ?

का रे वेळ हरी ! आता ? । येई हृदयी जगत्राता ! ॥
दाटुनिया कंठ आला । कधी देसी भेटी मला ? ॥
शिरी दुःखाचे डोंगर । वाहतसे वारंवार ।।
नाही कोणी बाप-माय । धरू कोणाचे मी पाय ? ॥
तापलो गा ! तिन्ही तापे । आचरलो द्रृष्ट पापे ॥
जरी पापी मी अधम । पतिताचे करी काम ॥
तुकड्या तो शरण गेला । त्यासी देवे ठाव दिला ॥