आजी धन्य दिन झाला
श्रीगुरु आडकोजींच्या छायेत
दर्शनाने धन्यता
आजि धन्य दिन झाला । स्वामी सदगुरु भेटला ।।
सुटली संसाराची आस । झालो आडकुजींचा दास ।।
लागता संतचरण - रज । चुकेल चौ-यांशी सहज ।।
तुकड्या म्हणे धन्य झालो । संत-चरणासी लागलो ।।