का भ्रमलासी,का भ्रमलासी? जा शरण गुरु-पायासी
(चाल: भाब धरारे! अपुलासा देव..)
का भ्रमलासी,का भ्रमलासी? जा शरण गुरु-पायासी ।।धू० ।।
ही अवचित वेळा आली, सुंदर काया तुज धाली ।
रे! उघड सुखाची खोली, बघ अनिवाशी ।। जा ०।।१॥।
धन-जोड जमवुनी सारी, करिसी घरं-माडि-अटारी ।
मग शेवट होशि भिकारी, सोडुनि जाशी ।। जा ०।।२॥।