कैसे जावे तीर्थक्षेत्री I

कैसे जावे तीर्थक्षेत्री । तेथे त्रास हा सर्वत्री ॥
भक्ति करू नेदी कोणी । मागे अडका रुका कणी ॥
कोणी चोर चोरी करी । कोणी खिसेचि कातरी ॥
तुकड्या म्हणे निर्मळ व्हावे । तेणे ठायी तीर्था जावे ॥