बा! सत्संगावाचुनी, अनुभव मनी, नये हो साचा
(चाल: रे, नरा! आत बघ जरा..)
बा! सत्संगावाचुनी, अनुभव मनी, नये हो साचा]
पाहिजे प्रथम साधना, भाव इच्छेचा ।)धृ०।|
ती पहा नवविधा भक्ति, तिला ही शक्ति, प्रथम श्रवणाची |
श्रवणास पाहिजे संत - संगती साची
रे, स्वयंभु आत्मा कसा, दिसे तुज तसा, सद्गुरुविणा? |
तो क्कचितचि ऐसा विरळा निज शाहणा || प
नच उदरि पडुनि भूवरी, होत गुणकारी, भक्त देवाचा ।। पाहि०॥।१॥
सांगती वेद हो वक्रदषी, संत अगणिती, अती जोराने
रे ! संत-समागम केल्याविण का जाणे?।।
मोक्षास पाहिजे गुरु, प्रथम आधारु, मार्ग दावाया।
ऐसे न घडे कल्पांती जाइल वाया।।
जोवरी नव्हे ती कृपा, तोवरी वफा, मार्ग जाणावबा।
ज्या असेल इच्छा , तपे गुरु शोधावा ।।
ही पहा ग्रंथिची मात, बोलिली तूर्त, गुरू लीनतेचा ।। पाहि० ।।२॥
सद्गुरु वदे जे वाचे, जाण ते साचे, पूर्ण श्रध्देने)
निज वस्तु तुला जरि व्हाबि, उघड मग कर्णे ।। |
बघ पुढे दृष्टी ठेवुनी, कितिक अभिमानि बुडाले सारे।
धर लिनता आता, सोड गर्व सखया, रे!।।
दीन तुकड्या हा पामरु, आडकुजी गुरू भजा प्रेमाने ।
निज जन्म-सुधारण करा गडया ! नेमाने ||
तो दयाल साचा हरी, भक्त-कैवारी, असे दीनांचा ।। पाहि?