आवरा मना गडे हो !
(चालः धन्य जाहला माझा...)
आवरा मना गडे हो ! आवरा मना ॥धृ0॥
मनचि विघ्न भक्तिमाजी होउ न दे देव राजी ।
इंद्रिय हे करुनि पाजी फुलवि कामना ॥१॥
जप - तप हे करित भंग वाढु न दे भक्ति - रंग ।
साधू न दे संतसंग भ्रमवि भावना ॥२॥
मनचि एक करुनि स्थिर रिझवा प्रभु धरुनी धीर ।
तुकड्या म्हणे का उशीर ? भज दयाघना ॥३॥