आटापिटा करोनियाहि बांधले घरा !
( चाल - क्या जाने अमिरी , गरिबी का मजा क्या है . . . )
आटापिटा करोनियाहि बांधले घरा !
कळले , उगीच व्यर्थ कासयास हे करा ? | | धृ० ॥
ही हौस पुरी होते का सर्व बांधता ?
की , अधिक वाढते मनाची व्यर्थची व्यथा ?
दिसला न कुणी ऐसा मज शांतिचा पुरा ! ॥ १ ॥
ही सर्व घरे अमुची समजुनि रहावे ।
होईल तशी सेवा , सदभावे भरावे । ।
सत्कीर्ति भव्य मंदिरेचि उध्दरी नरा ! । । २ । ।
या संग्रहाचि नीती ना थोडीहि बरी ।
चोरी करावयाचि बुध्दि होतसे वरी । ।
म्हणुनीच सांगतो गडे हो ! धीर घ्या पुरा ! । । ३ । ।
ऐकाल तरी ऐका निष्काम रहावे ।
सत्कार्य करित जावे , उपकार करावे । ।
तुकड्या म्हणे , ही वचने हृदयासि वापरा ! ॥ ४ ॥
- तिवसा , दि . ०५ - ११ - १९६१