कोटि - कोटि दीप तुझिया जळति अंतरि
( चालः तुझिया निढळी कोटी . . . )
कोटि - कोटि दीप तुझिया जळति अंतरि ।
बघशी काय बाहेरी सुजना ? | | धृ० ॥
वृत्ति ऊर्ध्व करुनी पाहे , झरा अमृताचा वाहे ।
वाद्य वाजती सुंदर ही , घोळ झांजरी ।
बघशी काय बाहेरी , सुजना ? ॥ १ ॥
गुंगवितो सोहंवीणा , समाधी सुखाच्या स्थाना ।
दिव्यदृष्टि लाभे जपता , आजपा पुरी ।
बघशी काय बाहेरी , सुजना ? ll २ ।।
सकळ तीर्थ जागी वंदी , आपुल्याच लाभे छंदी ।
विश्वदर्शनाची संधी , लाभते खरी ।
बघशी काय बाहेरी , सुजना ? ll ३ ॥
तूच देव ऐसे आहे , तत्व शोधुनिया पाहे ।
विनवि दास तुकड्या , तुझि ही वृत्ति सावरी ।
बघशी काय बाहेरी , सुजना ? ll ४ ll
- पचमढी , दि . १९ - ११ - १९५४