नको हे वैभव ज्ञानाचे, क्रियेविण सोंगचि रोगाचे

(चाल : जमका अजब तडाका बे..)

नको हे वैभव ज्ञानाचे, क्रियेविण सोंगचि रोगाचे |।धृ ०।।
रेचक, कुंभक, खेचर-भूचर, साधिति पळभर कोणी |
विषय-वासना नष्ट होईना, दिसे जगाला ज्ञानी।।१।।
आसन-साधन साधुनि कोणी, अन्नावाचुनि राहती ।
अहंकार कधि लीन न झाला, का स्वरुपाला पाहती ?।।२॥।
ज्ञान सांगता वाटत सोपे, क्रिया कराया नडती।
घरदाराचा पाश न गेला, मग अंती तडफडती।।३॥।
सुख व्हावे म्हणुनिया जगाला, एकचि इईश्‍वर दावी ।
मी तू भाव शरीरी भरला, बोलकाचि गोसावी | |४॥।
मला आवडे भाविक वृत्ती, वेदान्ताअधि घ्यावी ।
विवेक-जागृति करुनी आधी, ज्ञानदृष्टि शोधावी ।।५।।
दृढ कर्माचा हट्टि बनुनिया, प्रेमे ईश्‍वर गाई ।
सुख, दु:खे ती सहन करोनी, मी-तू ला नच घेई ।।६॥।
तुकड्यादासा आस तयाची, निश्चय कर्मी ज्याचा |
कर्मसाधना दृढ होई जव, ब्रह्मचि होई साचा ।।७॥