एका पुरुषा कारण l वंश बरा लागे जाणं

एका पुरुषा कारण । वंश बरा लागे जाण ॥
त्यासी उपाय करावा । पुरुष तो हो लोका ठावा ॥
ऐसे शास्त्राचे ते मत । बोलताती सत्य संत ॥
तुकड्या म्हणे गुह्य जाणा । शोधा पंढरीचा राणा ॥