कावळ्यासी जेवी नाही दया शांती

कावळ्यासी जेवी नाही दयाशांंति । तेवी मूढा अंती यम ओढी ।।
करी रे त्वरित जन्माचे साधन । नाही तरी प्राण व्यर्थ जाय ॥
चौ-यांशी भोगिता प्राप्त झाली काया । आता तरी वाया धाडू नका ॥
तुकड्या म्हणे दोन अक्षरांचे काम । उच्चारावा राम वेळोवेळा ॥