का रे आज तू ना सावध राहसी ?
का रे ! आज तू ना सावध राहसी ? । व्यर्थचि मरसी संसारात ॥
समारही करा परमार्थासी धरा । सुटती ये्झारा चौ-यांशीच्या ॥
अद्वैताचा वास द्वैताची सोबत । नकोरे एकांत काही बापा ! ।
विठ्ठल सोयरा करुनि घे आधी । न करी उपाधी तुकड्या म्हणे ।