करुनिया थाट काय हो ! मातीशी ?
करूनिया थाट काय हो ! मातीसी ? । पुढे ती क्षितीसी मिळो लागे ॥
लावोनी अत्तर,कोट,फेटा शिरी । अंती नाही परी कीर्ती कोठे ॥
रेशमी धोतर, घोडा बसायासी । सखा अविनाशी काय भेटे ?॥
तुकड्यादास म्हणे उदास राह । त्याहुनी शहाणे हेचि बरे ।।