प्रभुविण कोण करिल भवपार?

(चाल: राग- जीवनपुरी....)
प्रभुविण कोण करिल भवपार? ।।धृ०।।
मित्र, गडीगण , स्वार्थ-लोभि हे, चलतीचा संसार ।।१॥।।
मी मी म्हणता आयुष्याचा, होइल धूंबाधार ।।२॥।|
साक्ष नसे कोणाची असली, येइ्‌ सवे घरदार।३|।
तोंडापुरते मतलबि प्यारे, घेतिल मग माघार ।।४|।
तुकड्यादास म्हणे या हो या, धरु ऐसा निर्धार ।]५॥।।