काढोनीया पाणी जरी टाका किती
काढोनिया पाणी जरी टाका किती । तरी काय क्षिती विलया जाय ? ।।
तैसाही विचार केला हो शरीरी । तरी का बाहेरी मन निघे ? ॥
शिकवाया विद्या मूल ते निघाले । कॉलेजात गेले तरि का होय ? ।।
म्हणे तुकड्यादास मर्कटाप्रमाणे । चंचल हे मन रोका यासी ॥