काय बापुडे मरण ?

काय बापुडे  मरण ? । काळासहीत वांधीन ॥
भय नाही हो! यमाचे । जरी नाम घेता नाचे ॥
काळ कापतो थरथर । करिता नामाचा गजर ।।
तुकड्या म्हणे घेता नाम । प्राप्त होई निज धाम ॥