का वाजवितो असि बसि तुझी ?
( चाल : दो दिन के लिये . . )
का वाजवितो असि बसि तुझी ? मनि भूल पडे व्यवहाराची ।
कर्णात ध्वनी करि मस्त निशा, सुधबुध हरे या शरिराची ।।धृ।।
मागेच तुझ्या या मुरलीने , किती गोपिगोप वेडे केले ।
अजुनी न खुशी झालीच तुझी, धरलीस धुरा ही का अमुची ।। १।।
मुरलीत तुझ्या जे मोहविले,उरले न जगी अपुले म्हणण्या ।
तुकड्याम्हणे जरि करशील असा,तरि भीति न ठेवि पुन्हा कसची l।२।।
- हैद्राबाद , दि . १४ - ०१ - १९५५