कसले मन निर्दय असले !
( चालः धन मत जोडे . . )
कसले मन निर्दय असले ! जे प्रसंगि कामि न आले ॥ ध० ॥
बोल बोलता गोड गोड हे , विशाल निर्मळ दिसते हे ।
जवळ जाउनी बघता क्षणभर , दगडापरि कोसळले । जे ॥१॥ सर्व लोक अमुचेच म्हणूनिया, उत्तम भाषण देते हे ।
प्रसंग येता जाउनि बघता , अग्नि परी जळजळले ॥ जे०॥२॥ स्वार्थासाठी सर्व बाजुनी , विनम्रता दर्शविते ही ।
तुकड्यादास म्हणे त्यागास्तव, दिसती असले नसले ।।जे०॥३॥
- नशिराबाद , दि . १६ - १२ - १९५५