काय घडली चुकी हे कळेना मला

(चाल: सारी दुनिया का तूही करणधार है...)
काय घडली चुकी हे कळेना मला ।
पाहतो परि तू दिसेना अगा ! विठ्ठला ॥धृ0॥
मूर्ति दिसते परि दिव्यता लोपली ।
सर्व दिसते परी प्रियता भंगली I
बोलना राजसा कोणि नेले तुला ॥१॥
एकट्याने तुला कैसे न्यावे हरी I
दीन अम्ही असो तुझे द्वारावरी I
न्याय का न देशी तू असुनी एकला ॥२॥
सर्व तारांगणा चंद्र ना एकटा ?
सर्व गोपी  मधें कृष्णची एकटा ॥
दास तुकड्या म्हणे येऊ दे शांतिला ॥३॥