काय रे ! करिसी वाचाळता फार
काय रे ! करिसी वाचाळता फार l काय तो ईश्वर मिळे तुज ? ॥
काशी-गया जासी कराया स्नानासी । रूप अविनाशी मिळे केवि ? ॥
चार देहामाजी चारचि अवस्था । होई साक्षीभूत पहायासी ॥
म्हणे तुकड्यादास विद्या जरी पाठ । तरी कां संकट फेरी चुके ? ॥