उलटली स्थिती शास्त्र झाले खोटे

उलटली स्थिती, शास्त्र झाले खोटे । परी माझे गोमटे गोड लागे ॥
वडिलांचा मान सर्व झाला भंग । घेती मुले जोग बापा पुढे ॥
वेश्येचा बाजार नवीन पद्धत । गोड ते बोलत राघू जैसे ॥
तुकड्यादास म्हणे खाती पुढे लाता । स्त्रिये उचलिता भय नाही ॥