काव्य दृष्टी माझी नव्हे गुरुराया !
काव्यदृष्टी माझी नव्हे गुरुराया ! l प्रेम- व्यवसाया लागलोसे ॥
एकाग्र साधन दिसे मज याने । म्हणोनी लिहिणे आरंभिले ।
आता कृपा करी दीनावर त्राता । ठीवतसे माथा चरणी तुझ्या ।।
म्हणे तुकड्यादास पुरवावी आस । सोसवेना त्रास जगाचा हा ॥