आजी पाहिला पाहिला I

 आजी पाहिला पाहिला । बाप विठ्ठलु पाहिला ॥
बहुत सुकृत फळले । रूप नेत्रा आकळले ॥
सगुण साकार हा हरि । भक्ति भावाचा कैवारी ॥
तुकड्या म्हणे शरण गेलो । जाता तेथेचि राहिलो ॥