काही नुरले माझे आता I

काही नुरले माझे आता । सर्वावरी त्याची सत्ता ॥
पूजा कासयाने करू । कोणा सोडू कोणा धरू ? ॥
काही नाही पूजावया । सर्व विठ्ठलाची माया  ॥
तुकड्या म्हणे मी अर्पण । झालो जीवे भावे पूर्ण ॥