काळ नका खोवू फुका I

काळ नका खोवू फुका । बसेल आयुष्यासी धक्का ॥
गेली वेळ बरी जाते । दुःख होईल मागुते  ॥
वडिले केला अनुताप । विरता इंद्रियाचा दर्प  ॥
तुकड्या म्हणे काय होते । वेळ गेलिया मागुते ? ॥