केशव भावाचा भुकेला I

केशव भावाचा भुकेला । भाव पाहता तृप्त झाला ॥
नको  त्यासी अभिमान । जेणे होतसे पतन ॥
भोळ्या भक्तिचे मिष्ठान । देव मागतो धावून ॥
तुकड्या म्हणे मोठेपणा । लावा देवाच्या चरणा ॥