काय होते जपतपे I

काय होते जपतपे । हठयोगाच्या संकल्पे ? ॥
जया देवकृपा नाही । तया शीणचि सर्वही ॥
शुद्ध भक्ति राहे मनी । तरीच पावे चक्रपाणी  ॥
तुकड्या म्हणे प्रेमाविण । दूर राहे नारायण  ॥