कृष्ण कृष्ण आठविती I

कृष्ण कृष्ण आठविती । कृष्णमय होय कांति ॥
त्यासी नुरे देहभान । पहा गोपींचे जीवन ॥
दिव्यावरी बोट जळे । परी भानचि निराळे ॥
तुकड्या म्हणे गिरिधारी । खरा भक्तांचा कैवारी ॥