कोण आहे ऐसा येईना समोर

काण आहे ऐसा येईना समोर । 
बांधूनी कमर रामनामी ? ॥
जाऊ न दे श्वास रामनामावीण ।
कधी न ये शीण स्मरावया ।।
काळासम दिसे असूरा राक्षसा । 
अंतरीचा ठसा दिव्य ज्याचा ॥।
तुकड्यादास म्हणे का न तो उद्धरे ? । 
दुजियांसी तारे, भाव माझा ॥