कोण्या एका भांड्यामाजी I

कोण्या एका भांड्यामाजी । दोन वस्तु नव्हती राजी ॥
एक लौकिकी मरावे । अथवा देवाचि भजावे  ॥
एक प्रापंचिक व्हावे । अथवा परमार्थी रहावे ॥
तुकडया म्हणे एक करा । दोन्हीकडे नाही थारा  ॥