काही वस्त्राची चाचणी I

काही वस्त्राची चाचणी । लक्ष बाहेर वहाणी ॥
काही मानपान अंगी । मन द्रव्याच्या कुसंगी ॥
काही लक्ष गड्या सवे । काही बाह्य रंग भावे ॥
तुकडया म्हणे देव पाहे । परी हा शुद्ध खोका राहे ॥