काम क्रोधाची बंधने I

काम क्रोधाची बंधने । न तुटती तोडल्याने  ॥
त्याग वैराग्याची सुरी । तरीच पळती सहा वेरी ॥
ज्ञान प्रकाशी पहावा । कोठे ठेविला निज ठेवा ॥
तुकड्या म्हणे केला नाश Iभूते झोंबली अंगास  ॥