एका बीजाचिया पोटी I

एका बीजाचिया पोटी । वृक्ष थोर होती कोटी ॥
आधी सूक्ष्म मग जड । तैसा हरि भासे उघड  ॥
कैसी ईश्वराची माया । प्रसवे जगाचीया कार्या  ॥
तुकड्या म्हणे नोहे दूर। जग जाणावा ईश्वर ॥